संस्थेची ध्येये व उद्दिष्टे
१. भटक्या व विमुक्त जमातींचे संघटन करून त्यांचा सर्वांगीण विकास करणे.
२. अंध व अनाथ व्यक्तींना आर्थिक, शैक्षणिक व इतर प्रकारची मदत करणे.
३. प्रौढ शिक्षणाला चालना देणे व प्रसार करणे.
४. स्वस्त अन्नधान्य योजना सुरू करणे.
५. गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या व शैक्षणिक साहित्य पुरविणे.
६. मोफत वाचनालय चालविणे.
७. अंध व्यक्तींना त्यांच्या दैनंदिन जीवनासाठी आवश्यक शिक्षण व प्रशिक्षण देणे.
८. अंध व्यक्तींसाठी आश्रम, वसतिगृह किंवा अन्य सुविधा उपलब्ध करून देणे.
९. विधवा, गरीब व विद्यार्थिनींना मार्गदर्शन करून रोजगार विषयक माहिती देणे.
१०. दुर्बल घटकांवरील अत्याचार व अन्याय यांना प्रतिबंध करण्यासाठी प्रयत्न करणे.
११. समाजोपयोगी मोफत शिबिरे आयोजित करणे, जसे रक्तदान, नेत्रदान, आरोग्य तपासणी व एड्स जनजागृती.
१२. सांस्कृतिक व राष्ट्रीय स्तरावरील विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे.
१३. सर्वांगीण क्रीडा विकासासाठी खेळाडूंना प्रोत्साहन व मदत करणे.
१४. केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा प्रचार व प्रसार करणे.
१५. दारूबंदी, व्यसनमुक्ती व सामाजिक सुधारणा यांसाठी जनजागृती कार्यक्रम राबविणे.
१६.हुंडाबळी विषयी लोकांना जागृत करणे
१७. आंतरजातीय विवाह प्रोत्साहन देणे
१८. लिंग भेद विषयी चाचणी करण्यास विरोध करणे. (मुलगा व मुली समान मानणे)
१९. ग्रामीण भागातील आर्थिक दुर्लभ घटकातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्यक्रम सुरू करणे
२०. भटक्या व विमुक्त समाजाच्या वैचारीक प्रबोधनासाठी चर्चा रात्र, पेरसंवाद, शिबीरे, मेळावे व परिषदा भरविणे व त्या संदर्भातील साहित्य प्रकाशित करणे. ग्रंथालये वाचनालये सुरू करणे तसेच अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रमा विषयी माहिती देणे. त्याच बरोबर समाज -जागृती व उन्नतीसाठी विविध कार्यक्रम आयोजित करणे. संपूर्ण भटक्या व विमुक्त समाज संघटीत करणे त्यांच्यात सांस्कृतीक, बौद्धीक,राजकीय, सामाजिक व आर्थिक जागृती निर्माण करणे.
२१. शासनामार्फत तसेच विविध संस्थांमार्फत भटक्या व विमुक्त समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची सविस्तर माहिती कार्यशाळा घेवून भटक्या व विमुक्त बांधवांना करून देणे.
Contact to Bhatkya Vimukt Adivasi Sanstha


bhaskar bhalerao
President




